दंडात ९० टक्के माफीसाठी एक महिन्यांचा कालवधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंडात ९० टक्के माफीसाठी 
एक महिन्यांचा कालवधी
दंडात ९० टक्के माफीसाठी एक महिन्यांचा कालवधी

दंडात ९० टक्के माफीसाठी एक महिन्यांचा कालवधी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २० : मुद्रांक शुल्काच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेत ९० टक्क्यांपर्यंत सूट मिळण्यासाठी अवघा एक महिन्यांची मुदत राहिली आहे. ही मुदत ३१ जुलै रोजी संपुष्टात येणार असून त्यानंतर दंडाच्या रकमेच्या केवळ पन्नास टक्केच सूट मिळणार आहे. दरम्यान, पुणे शहरात मुद्रांक शुल्क कमी भरल्याची ४ हजार ४१२ प्रकरणे आहेत. यातील तीन हजार प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरण्याची नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली.
ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तूट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करून या दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी केले. मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरण्याची नोटीस पाठविल्यानंतर सह जिल्हा निबंधक कार्यालयात ७३ प्रकरणे दाखल झाले आहेत. यातील २७ प्रकरणांमध्ये सुमारे तीन कोटींची रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित ४६ प्रकरणांमध्ये चलन देण्याचे काम सुरू आहे, असे पारखे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82048 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top