
पक्ष्यांची धडक टाळण्यासाठी पुणे विमानतळावर उपाययोजना डीजीसीएने धाडले पत्र; अस्वच्छता होऊ नये यासाठी प्रयत्न
पुणे, ता. २० दिल्ली-पटणा विमानाच्या इंजिनला रविवारी पक्ष्याने धडक दिल्याने पुन्हा एकदा बर्डहिटचा विषय चर्चेला आला. सुदैवाने विमान माघारी फिरून सुरक्षितरित्या लँडिंग केले. मात्र, या घटनेनंतर डीजीसीए (डायरेक्तट जनरल सिव्हिल एव्हिएशन) ने देशांतील सर्व विमानतळांवर पक्ष्यांची धडक बसू नये म्हणून, योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे पुणे विमानतळ प्रशासनाने देखील तत्काळ परिसरातील गवत काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच कुठे अस्वच्छता होऊ नये, या करिता सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात गवताचे प्रमाण वाढते. परिणामी किड्याची संख्या वाढते. ते किडे खाण्यासाठी पक्ष्यांची हालचाल देखील मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे विमानांना मोठा धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी योग्य ते खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे विमानतळ परिसरात गवत काढण्याचे काम सुरू झाले. तसेच धावपट्टीचा परिसर स्वच्छ ठेवणे, तिथे पाणी साचू न देणे, उघड्यावर कोणते खाद्यपदार्थ येऊ नये, यासाठी विमानतळ प्रशासन काम करीत आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणांत पक्ष्यांची हालचाल होत असते. त्यामुळे विमानांना पक्ष्यांची धडक बसू नये म्हणून, योग्य त्या उपाययोजना आखल्या जात आहे. विमानतळ प्रशासन सतर्क आहे.
-संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे, विमानतळ.
एसी बिघडल्याने जबलपूर-पुणे विमान रद्द
जबलपूर हुन पुण्याला येणाऱ्या विमानातील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने अखेर ते विमान रद्द करण्यात आले. हा प्रकार रविवारी घडला. विमानच रद्द झाल्याने सुमारे सत्तर प्रवाशांची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली. सोमवारी दुसऱ्या विमानाने ते प्रवासी पुण्यात दाखल झाले. जबलपूर -पुणे विमानास या पूर्वी देखील खराब हवामानाचा फटका बसला होता. आता एसीचा फटका बसला. दुसऱ्या दिवशी प्रवासी पुणे विमानतळावर दाखल झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82078 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..