
टूरमध्ये त्रृटीयुक्त सेवा मिळालेल्या पर्यटकाला दिलासा
पुणे, ता. २० : कैलास मानस सरोवर यात्रेदरम्यान त्रृटीयुक्त सेवा दिली म्हणून टूर कंपनीने तक्रारदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये द्यावे, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे.
याबाबत मेधा शिरसाट यांच्यातर्फे विशाल शिरसाट, लता पाटील यांनी चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. संचालका विरुद्ध आयोगात तक्रार दाखल केली होती. शिरसाट आणि पाटील यांनी २३ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत यात्रा कंपनीमार्फत यात्रेसाठी प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये भरून बुकिंग केले होते. पैसे भरते वेळी तक्रारदारांनी त्यांचे वय ६२ असल्याने यात्रेदरम्यान घोडे, पोर्टर लागेल याची पूर्वकल्पना कंपनीला दिली होती.
पुरांगहून मानस सरोवर कडे जाताना घोडे आणि पोर्टरचे पैसे तक्रारदारांकडून घेतले. त्यानंतर कंपनीने यमद्वार येथून घोडे, पोर्टरची व्यवस्था होत नसल्याचे सांगण्यात आले, असे तक्रारीमध्ये नमूद आहे. यावर कंपनीने आयोगात म्हणणे सादर करत तक्रारदारांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. नुकसानभरपार्इपोटी २५ हजार रुपये, तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये देण्याचा आदेश आयोगाने दिला.
कंपनीचे सर्व प्रशासन आता बदलले आहे. यापुढे ग्राहकांना आणखी चांगली सुविधा देण्यात येर्इल. यापुढील काळात कोणी आयोगात जाणार नाही, अशी सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांना झालेल्या त्रासाची भावना आम्ही समजू शकतो.
-रामगोपाल चौधरी, कार्यकारी संचालक, चौधरी यात्रा कंपनी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82474 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..