शाहिरीसारखी लोककला जपली पाहिजे ः रासगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहिरीसारखी लोककला 
जपली पाहिजे ः रासगे
शाहिरीसारखी लोककला जपली पाहिजे ः रासगे

शाहिरीसारखी लोककला जपली पाहिजे ः रासगे

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः सध्याच्या आधुनिक काळात शिक्षणाबरोबर पारंपारिक कला, वाद्य आणि शाहिरीसारखी लोककला जपली पाहिजे, असे मत डॉ. गंगाधर रासगे यांनी व्यक्त केले.
दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था संचालित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कला व सांस्कृतिक प्रबोधनी आयोजित सनई वादन जुगलबंदी आणि पारंपारिक लोककला आणि शाहिरी कार्यक्रमात रासगे बोलत होते. यावेळी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी व्यवस्थापक दिलीप खुडे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब सोनवणे, साहेबराव खंडाळे, लक्ष्मण लोंढे, लेखिका शुभा, आत्माराम लोंढे, संतोष माने, अनंत भिसे आदी उपस्थित होते.
सनई वादक शंकर नारायण कसबे, क्लारोनेट वादक लक्ष्मण रिठे यांनी क्लासिकल ‘‘ज्योती कलश’’ आणि मराठी नटरंग चित्रपटातील ‘‘खेळ मांडला’’ हे गीत सादर केले. शाहीर सदाशिव भिसे यांनी भाऊ बापू नारायणगावकर यांचा वग आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रसिद्ध छक्कड ‘‘माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली’’ सादर केली. ताशा वादक बालाजी कांबळे यांनी कला सादर केली. विद्रोही कवयित्री नकोसा ताई लोखंडे यांनी ‘आमचा धर्म कोणता’ हे प्रबोधन गीत सादर केले. प्रास्ताविक सुजित रणदिवे यांनी केले. आभार संघ प्रमुख राजू धडे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82598 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top