आमचा प्रवास सध्या मुंबई ते आसाम ः सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमचा प्रवास सध्या 
मुंबई ते आसाम ः सुळे
आमचा प्रवास सध्या मुंबई ते आसाम ः सुळे

आमचा प्रवास सध्या मुंबई ते आसाम ः सुळे

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : राज्याच्या राजकीय हालचालीचे केंद्र आता मुंबईकडून आसामकडे सरकले आहे. आणि आम्‍हीही त्याच प्रवासात अडकल्याची खंत खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. निमित्त होते यशस्विनी महिला सन्मान सोहळ्याचे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळपासून राज्यभरातील यशस्विनी महिलांची लगबग सुरू होती. समाजातील सहा क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार होता. निमंत्रितांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव होते. मात्र, मंगळवारपासून राज्यात चाललेल्या सत्ता नाट्यातील आपत्कालीन स्थितीमुळे, कोणी येणार का नाही याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते. निदान साहेब नाही तरी ताई येतील, या अपेक्षेने सर्वच जोरदार तयारी करत होते. पण राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आणि राष्ट्रवादीची भूमिका पाहता दोन्ही खासदार उपस्थित राहणे शक्य नव्हते. मात्र, पुरस्कार सोहळ्यात प्रास्ताविकासाठी खासदार सुळे ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. अगदी काही मिनिटांसाठी ‘झूम’वर आलेल्या खासदार सुळे यांनी सुरवातच अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करत केली. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खूप मेहनत घेतली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पवार साहेब उपस्थित राहू शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तुम्हाला माहीत आहे. आमचा प्रवास सध्या मुंबई ते आसाम असा चालू आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82686 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top