विविध कायद्यांबाबत जागरूकता शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध कायद्यांबाबत जागरूकता शिबिर
विविध कायद्यांबाबत जागरूकता शिबिर

विविध कायद्यांबाबत जागरूकता शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘किमान समान कार्यक्रम २०२२’ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल न्याय मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने बाल निरिक्षण गृहामध्ये कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप, बाल न्याय मंडळाच्या पीठासीन अधिकारी मानसी परदेशी, डॉ. एल. एन. दानावडे, के. टी. थोरात, जी. एन. पडघन, के. एस. कोल्हटकर उपस्थित होते. शिबिरामध्ये परदेशी यांनी बाल न्याय मंडळाच्या कार्यवाहीची माहिती दिली. दानावडे यांनी बाल कामगार विरोधीदिन, तसेच अन्न सुरक्षा कायदा या विषयावर माहिती दिली. कोल्हटकर यांनी मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा यावर माहिती सांगितली. कश्यप यांनी विधी संघर्षग्रस्त बालक व त्यांच्या पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या शिबिरात पुणे निरिक्षण गृहामधील सुमारे ७५ बालकांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82773 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top