ज्ञानोबा-तुकोबांच्या स्वागतासाठी पुणे परिसरात वरुणराजाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानोबा-तुकोबांच्या स्वागतासाठी पुणे परिसरात वरुणराजाची हजेरी
ज्ञानोबा-तुकोबांच्या स्वागतासाठी पुणे परिसरात वरुणराजाची हजेरी

ज्ञानोबा-तुकोबांच्या स्वागतासाठी पुणे परिसरात वरुणराजाची हजेरी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः दोन वर्षांच्या खंडानंतर संत ज्ञानोबाराय आणि संत तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांसह वरुणराजानेही संतांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सकाळपासून शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ होते, तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

चिंचवडसह औंध, सांगवी परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. चिंचवड परिसरात बुधवारी संध्याकाळपर्यंत ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर लवळे येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला. शहरातील सरासरी कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील आठवडाभर तरी आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शुक्रवारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82779 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top