नेहरु रस्ता उद्या पहाटे वाहतुकीसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरु रस्ता उद्या पहाटे वाहतुकीसाठी बंद
नेहरु रस्ता उद्या पहाटे वाहतुकीसाठी बंद

नेहरु रस्ता उद्या पहाटे वाहतुकीसाठी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी बुधवारी रात्री शहरात मुक्कामी आली. त्यामुळे नाना पेठ व भवानी पेठेत गुरुवारी (ता. २३) भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असली तरीही लक्ष्मी रस्ता व नेहरू रस्ता वाहतुकीसाठी नेहमीप्रमाणे खुला राहणार आहे. मात्र, शुक्रवारी पहाटेपासून दोन्ही पालख्या व दिंड्या मार्गस्थ होईपर्यंत नेहरू रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
बुधवारी सायंकाळी दोन्ही पालख्यांचे शहरात आगमन झाले. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बंद केलेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी पालखी मुक्कामस्थळी भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करणार आहेत. त्यामुळे पालखी मुक्कामस्थळाच्या परिसरात बॅरीकेटस्‌ टाकण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील डुल्या मारुती चौक ते संत कबीर चौक रस्त्यावर मोठ्या वाहनांना रस्ता बंद असणार आहे. लक्ष्मी रस्ता व नेहरू रस्ता नेहमीप्रमाणे वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. तसेच वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये, यादृष्टीने समर्थ वाहतूक विभागाकडून संबंधित रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास दोन्ही पालख्या मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून ते पालख्या, दिंड्या जाईपर्यंत नेहरू रस्त्यावरील रास्ता पेठेतील पावर हाऊस ते सेव्हन लव्हज चौकापर्यंत वाहतुकीसाठी रस्ता बंद असणार आहे, अशी माहिती समर्थ वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक राज बोरडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82819 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top