पालखी सोहळ्यामध्ये यंदाही चोऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळ्यामध्ये यंदाही चोऱ्या
पालखी सोहळ्यामध्ये यंदाही चोऱ्या

पालखी सोहळ्यामध्ये यंदाही चोऱ्या

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना यंदाही चोरट्यांचा फटका बसला. वाकडेवाडीपासून नाना पेठ, भवानी पेठेपर्यंत पालखी सोहळ्यात आलेल्या काही भाविकांचे दागिने, मोबाईल व पाकीट चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या. दरम्यान, एका चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

येरवडा येथे झालेल्या चोरीप्रकरणी कल्पना शरद गायकवाड (वय २७, रा. मेनलो होम्स सोसायटी, वाघोली) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कल्पना गायकवाड या त्यांच्या सहकारी शालिनी मुसळे, ज्योती रणधीर यांच्यासमवेत येरवडा येथील इंदिरानगरमधील दत्त मंदिरासमोर संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शन घेत असताना एका महिलेने गायकवाड यांची ९० हजारांची, मुसळे यांची ७५ हजार रुपयांची तर रणधीर यांची १५ हजारांच्या किमतीची सोनसाखळी चोरून नेली. चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यात मोबाईल चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. प्रेमराज राजेश पट्टपु (वय २२, रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याचा साथीदार दीपक ऊर्फ दिप्या (रा. देहुरोड) यांच्या मदतीने साधू वासवानी चौकाजवळ वुडलॅंड हॉटेल येथे मोबाईल हिसकावल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे हे गस्त घालत असताना त्यांना एक तरुण संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83164 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top