वारकऱ्यांनी केला मेट्रोने प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकऱ्यांनी केला मेट्रोने प्रवास
वारकऱ्यांनी केला मेट्रोने प्रवास

वारकऱ्यांनी केला मेट्रोने प्रवास

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत वारकऱ्यांनी वनाज ते गरवारे स्टेशनदरम्यान मेट्रोचा प्रवास केला. विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट व सारथी कट्टा यांच्या वतीने १४० वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली. गरवारे ते वनाज व वनाज ते गरवारे दरम्यान वारकऱ्यांनी प्रवास केला. वारकऱ्यांसाठी मेट्रो प्रशासनाने दोन डबे राखीव ठेवले होते. या डब्यात वारकऱ्यांनी फुगडी खेळली, तसेच अभंग गायिले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हा प्रवासाचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी सारथी ग्रुपचे पराग ओझा, राजेश राठोड, सुनील पांडे, पुणे मेट्रोचे अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे, विनायक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय फंड, वरुण जकातदार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83186 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top