सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनाचे संशोधन आर्थिक साक्षरतेत प्राध्यापक ‘कच्चे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ :  डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनाचे संशोधन 
आर्थिक साक्षरतेत प्राध्यापक ‘कच्चे’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनाचे संशोधन आर्थिक साक्षरतेत प्राध्यापक ‘कच्चे’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनाचे संशोधन आर्थिक साक्षरतेत प्राध्यापक ‘कच्चे’

sakal_logo
By

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनाचे संशोधन
आर्थिक साक्षरतेत प्राध्यापक ‘कच्चे’
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक एवढंच काय, तर महाविद्यालयांचे प्राध्यापकही आर्थिक साक्षरतेमध्ये कच्चे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकार अध्यासन आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

विद्यापीठाशी संलग्न पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील १८० महाविद्यालयांतील एक हजार प्राध्यापकांना विचारलेल्या प्रश्नावलीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. मुख्य संशोधन अधिकारी म्हणून गरवारे महाविद्यालयाचे डॉ. गणेश पटारे यांनी डॉ. भरत व्हनकटे आणि अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर यांच्या नेतृत्वात हे संशोधन केले. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. गीता आचार्य, पुणे जिल्हा समन्वयक डॉ. नागनाथ माने, नगर जिल्हा समन्वयक डॉ. गणेश कळमकर, नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. गणेश पाटील व डॉ. संतोष दळवी यांचा संशोधनात महत्त्वपूर्ण सहभाग होता.

अर्थसाक्षरता महत्त्वाची का?
पैसा म्हणजे काय अन् त्याचे व्यवस्थापनाबाबतचे शहाणपण म्हणजे अर्थसाक्षरता होय. निरोगी व जोखीममुक्त गुंतवणुकीच्या संधीसाठी काय करावे आणि काय करू नये याचे ज्ञान, त्यांचे कर्जाचे सापळे आणि आर्थिक शोषण होण्यापासून संरक्षण, हे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांचे पहिले उद्दिष्ट आहे.

सहभागी महाविद्यालये ः
पुणे ः १००
नाशिक ः ५०
नगर ः ३०

सहभागी प्राध्यापक
पुरूष ः ६०१
स्री ः ३९९

(गोलाकार ग्राफ करावा)
प्राध्यापकांचे आर्थिक स्थतीनुसार वर्गवारी (टक्क्यांत) ः
- १० ते ४० हजार ः ४४.१
- ४० ते ६० हजार ः ८.३
- ६० हजार ते १ लाख ः १८
- १ लाखापेक्षा जास्त ः २९.६

संशोधनातील तथ्ये ः
- ९० टक्के प्राध्यापकांना एकापेक्षा अधिक ठिकाणी गुंतवणूक गरजेची वाटते
- दीर्घकाळ आणि हमखास परताव्यातील गुंतवणुकीकडे कल
- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीकडे कल
- रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक अधिक फायदेशीर व शाश्वत असल्याचे मत

निष्कर्ष ः
- पुणे जिल्ह्यापेक्षा नगर, नाशिकमधील प्राध्यापकांत अर्थसाक्षरता कमी
- ६५ टक्के प्राध्यांपकांकडे क्रेडीट कार्ड नाही
- आर्थिक सर्वसामावेशकतेचा अभाव
- कोरोना काळात डी-मेट, स्टॉक मार्केट आदींमध्ये गुंतवणूक वाढली
- २५ ते ४० वयोगटातील शिक्षक मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक
- खासगी, विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे गुंतवणूकही कमी
- परतावा जरी जास्त असला तरी धोका पत्करण्याची मानसिकता कमी
- तज्ज्ञांच्या सल्ल्या ऐवजी लोकांच्या अनुभवाच्या आधारे गुंतवणूक

संशोधकांच्या सूचना ः
- प्राध्यापकांसह सर्व स्तरातील शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे गरेजेचे
- प्राध्यापकांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबिरे घेण्याची आवश्यता
- ‘कॅस’मध्ये आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचा आयाम जोडावा

मागील तीन दशकांपासून देशात आर्थिक संपन्नता वाढत आहे. अशा वेळी बचत, गुंतवणूक आदी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. सामाजाच्या प्रबोधनाची केंद्रे असलेल्या महाविद्यालये याबाबत मागे राहता कामा नये. महाविद्यालयांनी केंद्र स्थापन करता समाजात आर्थिक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे.
- डॉ. मुकुंद तापकीर, प्रमुख, पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकार अध्यासन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83766 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..