
पुण्यात सहा प्रभागांत महिला मतदार जास्त
पुणे, ता. २५ : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये शहरातील ५८ प्रभागांपैकी ६ प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ, रस्ता पेठ मध्यवर्ती भागात महिला मतदार जास्त असल्याने येथील उमेदवारांचे भवितव्य देखील महिलाच ठरविणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत ५८ प्रभागांतून १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यात एकूण ३४ लाख ५८ हजार ७१४ पुणेकर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी १८ लाख ७ हजार ६६३ पुरुष, १६ लाख ५० हजार ८०७ महिला मतदार आहेत. तर २४४ मतदार हे तृतीयपंथी आहेत. या प्रारूप मतदार यादीवर येत्या १ जुलैपर्यंत हरकती सूचना नोंदविल्या येणार असून ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रभागातील मतदारांची संख्याही कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
तृतीयपंथी मतदारांच्या संख्येतही वाढ
शहरात २०१७मध्ये ६७ तृतीय पंथीय मतदार होते. पण २०२२ मध्ये त्यांची नोंदणी वाढल्याने आता ही संख्या २४४ इतकी झाली आहे. ५८ पैकी ५१ प्रभागांत तृतीय पंथी मतदार आहेत. सर्वाधिक ४२ मतदार प्रभाग क्रमांक ४७ मध्ये (कोंढवा बुद्रूक-येवलेवाडी) येथे आहेत.
प्रभाग- पुरुष मतदार-महिला मतदार- एकूण मतदार
गोखलेनगर-वडारवाडी (क्र.१५)-३१५१०-३१६७३-६३१८४
फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणे (क्र.१६)-३२१०९-३३२४५-६५३५४
शनिवार पेठ-नवी पेठ (क्र.१७)-३१५८२-३३३०६७-६४६४९
शनिवारवाडा-कसबा पेठ (क्र.१८)-३२४८५-३३५८८-६६०७६
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्तापेठ (क्र.१९)-२२६४०-२२६७८-४५३२१
घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई (क्र. २९)-२९१२०-२९१८०-५८३०४
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83806 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..