‘पीओपी’च्या मूर्तीवरील बंदी कडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीओपी’च्या मूर्तीवरील बंदी कडक
‘पीओपी’च्या मूर्तीवरील बंदी कडक

‘पीओपी’च्या मूर्तीवरील बंदी कडक

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिकेकडून मूर्तींचे विघटन करण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम बाय कार्बोनेटची खरेदी केली जाणार नाही, असा निर्णय घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे, तर दुसरीकडे पीओपीच्या गणेशमूर्तींचे उत्पादन सुरू असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात या निर्णयाच्या अंमलबजावणीरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शहरात घरोघरी किमान तीन ते साडेतीन लाख मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. शहरात अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्ती मिळतात; पण पीओपीच्या मूर्तींची विक्री करण्याचे प्रमाण जास्त आहे. गणेशोत्सव अडीच काही महिन्यांवर आल्याने मूर्तीकारांकडून कामाला गती आली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दोन वर्षांपूर्वीच पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे, पण कोरोनामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नव्हती. मात्र, यंदापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे, त्याचे पत्रही महापालिकेला देण्यात आले आहे.
पीओपीच्या मूर्तीमुळे नदी प्रदूषण होते. या मूर्ती नदीत विसर्जित करण्याऐवजी घरच्या घरी विसर्जित कराव्यात, यासाठी दरवर्षी अमोनिअम बायोकार्बोनेट महापालिका खरेदी करते व त्याचे नागरिकांना मोफत वितरण करते. पण यंदा पीओपीच्या मूर्ती विक्रीवरच बंदी घालण्यात आली असल्याने यंदा अमोनिअम बायोकार्बोनेट खरेदी करणार नाही, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी सांगितले.

समन्वय नसल्याने गोंधळ
गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलला अतिक्रमण आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून परवानगी दिली जाते. घनकचरा आणि पर्यावरण विभागाकडून पर्यावणाच्या दृष्टीने कारवाई केली जाते. पण या चारही विभागांत अद्याप समन्वय नाही. क्षेत्रीय कार्यालयांना विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पण कारवाईचे स्वरूप काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी, कारवाई कशी करावी यावर निर्णय घेण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83877 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..