गणेशोत्सवाला कोकणसाठी २५० एसटी बसेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाला कोकणसाठी २५० एसटी बसेस
गणेशोत्सवाला कोकणसाठी २५० एसटी बसेस

गणेशोत्सवाला कोकणसाठी २५० एसटी बसेस

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाच्या वर्षी २५०० एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुण्याहून कोकणासाठी २५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. शनिवारपासून तिकीट आरक्षणाची प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट काढता येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, गुहागर आदी आगारासाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. दरवर्षी पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन एसटी प्रशासन प्रवाशांची संख्या वाढली तर अतिरिक्त गाड्या देखील सोडणार आहे.
यासंदर्भात एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे म्हणाले, पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता २५० बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचे आरक्षण देखील सुरु झाले आहे.प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी तिकिटाचे आरक्षण करावे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83907 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..