एएमबी प्रक्रियेसाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एएमबी प्रक्रियेसाठी मुदतवाढ
एएमबी प्रक्रियेसाठी मुदतवाढ

एएमबी प्रक्रियेसाठी मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः लष्कराच्या तिन्ही दलांचे अधिकारी प्रशिक्षण देणारी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४८ व्या तुकडीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सैन्यदलाद्वारे काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय मंडळाच्या (एएमबी) तारखेची मुदत वाढ करण्याची सवलत देण्यात आली आहे.
एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पार पडते. परंतु, यंदा सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा उशिरा झाल्या. त्यामुळे काही उमेदवारांची इयत्ता बारावीची परीक्षा आणि एएमबीच्या प्रक्रियेची तारीख एकाच वेळी असल्याने त्‍यांना या प्रक्रियेत सहभाग घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अशा उमेदवारांना आपली एएमबीची प्रक्रिया येत्या गुरुवारपर्यंत (ता. ३०) पूर्ण करणे आवश्‍यक आहे. तसेच यानंतर कोणत्याही प्रकारे तारखांची मुदत वाढ करण्याची प्रक्रिया केली जाणार नसल्‍याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. याबाबतच्‍या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83949 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..