
शमशाद बेगम, घोषाल यांचा जीवनप्रवास उलगडला
पुणे, ता. २६ : क्रांतिज्योती महिला विकास संस्था व स्त्रीशक्ती महिला मंचातर्फे ‘शमशाद बेगम ते श्रेया घोषाल’ हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची संकल्पना गायिका सुनिता निंबाळकर यांची होती. गायक आशिष देशमुख व सुनीता निंबाळकर यांनी सर्व गाणी सादर केली. चित्रपटसृष्टीतील शमशाद बेगम ते श्रेया घोषाल या गायिकांचा प्रवास यातून उलगडला. चिंतन मोडा, नितीन शिंदे, बबलू सबनानी, नितीन खंडागळे, हिमांशू होते यांनी त्यांना साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सोहनी डांगे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर व अस्मिता मीराणे यांनी केले. यावेळी ॲड. वैशाली चांदणे, ज्ञानेश डांगे, साधना सोनवणे, राजेंद्र वाघ, ईशा कोळेकर, पल्लवी भागवत, अस्मिता चांदणे, रुपाली लांबे, वैजनती दंडनाईक, अंजली कुचेरीया, नितीन जैन आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84075 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..