‘डॉ. सदानंद मोरे यांचे लेखन म्हणजे महाराष्ट्राचे विश्वरुपदर्शन’ डॉ. राजा दीक्षित यांचे गौरवोद्गार; महाराष्ट्राची लोकयात्रा पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डॉ. सदानंद मोरे यांचे लेखन म्हणजे महाराष्ट्राचे विश्वरुपदर्शन’
डॉ. राजा दीक्षित यांचे गौरवोद्गार; महाराष्ट्राची लोकयात्रा पुस्तकाचे प्रकाशन
‘डॉ. सदानंद मोरे यांचे लेखन म्हणजे महाराष्ट्राचे विश्वरुपदर्शन’ डॉ. राजा दीक्षित यांचे गौरवोद्गार; महाराष्ट्राची लोकयात्रा पुस्तकाचे प्रकाशन

‘डॉ. सदानंद मोरे यांचे लेखन म्हणजे महाराष्ट्राचे विश्वरुपदर्शन’ डॉ. राजा दीक्षित यांचे गौरवोद्गार; महाराष्ट्राची लोकयात्रा पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

डॉ. मोरे यांच्या लेखनातून महाराष्ट्र दर्शन
डॉ. राजा दीक्षित यांचे गौरवोद्गार; महाराष्ट्राची लोकयात्रा पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, ता. २६ : ‘‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपल्याकडे समग्रपणे आणि सलगपणे उपलब्ध आहे. सामाजिक चळवळींचा इतिहास मात्र असा उपलब्ध नव्हता. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच या समतेच्या लढ्याचा इतिहासही सांगणे गरजेचे होते. ती गरज ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या पुस्तकाच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे,’’ असे मत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले. डॉ. सदानंद मोरे यांचे लेखन म्हणजे महाराष्ट्राचे विश्वरुपदर्शनच असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

ज्येष्ठ साहित्यिक आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे लिखित आणि सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार, संत नामदेव अध्यासनाचे अध्यक्ष प्रा. अभय टिळक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या खूप मोठ्या कालपटाचा तटस्थपणे घेतलेला वेध आहे. आज आपल्या आजूबाजूला सगळ्या प्रकारचे ध्रुवीकरण आहे. आपण अनेक प्रकारे विखंडित आहोत. आपल्या सोयीप्रमाणे विविध प्रकारे इतिहासाची मांडणी, फेरमांडणी, पुनर्मांडणी करत आहोत. इतिहास आणि इतिहासातील महापुरुष विशिष्ट धर्म, विशिष्ट जातीच्या चौकटीतून पाहत आहोत. अशा कालखंडात वेदापासून ते संविधानापर्यंतच्या काळाचा तटस्थ आढावा घेणारे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे.’’
दाभोलकर म्हणाल्या, ‘‘एका बाजूला समकालीन राजकीय, सामाजिक वास्तवामध्ये विचार म्हणून उभे राहणे आणि दुसरीकडे प्रत्यक्ष आयुष्यात लोकांच्या होत असलेल्या शोषणाबद्दल बोलत राहणे, या दोन आव्हानांवर सामाजिक चळवळींना आज काम करावे लागणार आहे.’’ अभय टिळक यांनी आपल्या मनोगतात संतसाहित्याचा सामाजिक चळवळींशी असलेला अनुबंध विस्तारपूर्वक मांडला. सूत्रसंचालन अमृता देसरडा यांनी केले.

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा सलग इतिहास आजवर लिहिला गेला नव्हता. त्या-त्या संप्रदायांच्या लोकांनी त्यांचा त्यांचा इतिहास लिहिला. पण समग्रपणे तो उपलब्ध नव्हता. त्यामुळेच या पुस्तकाची मांडणी करताना वेदापासून ते संविधानाच्या निर्मितीपर्यंत आणि अगदी अलीकडच्या डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चळवळींपर्यंतचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक

2S73887
टिळक रस्ता, पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. नीतू मांडके सभागृहात झालेल्या ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) श्रीराम पवार, डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, मुक्ता दाभोलकर आणि अभय टिळक.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84172 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top