रोटरीतर्फे मेट्रो स्थानकांवर विशेष सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीतर्फे मेट्रो स्थानकांवर विशेष सुविधा
रोटरीतर्फे मेट्रो स्थानकांवर विशेष सुविधा

रोटरीतर्फे मेट्रो स्थानकांवर विशेष सुविधा

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१च्या वतीने पुण्यातील १० मेट्रो स्थानकांवर विविध प्रकारच्या विशेष सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. या सुविधा प्रकल्पाचे लोकार्पण २९ जूनला सकाळी ११. ३० वाजता गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकावर होणार आहे.
रोटरी प्रांत ३१३१च्या वतीने आणि रोटरीच्या पब्लिक इमेज टीमच्या वतीने प्रांतपाल पंकज शहा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विनोदकुमार आगरवाल, क्रांती शाह या वेळी उपस्थित होते.
शहा म्हणाले, मेट्रोच्या प्रवाशांना आणखी उपयुक्त सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने रोटरी क्लब १० स्थानकांवर विविध उपयुक्त गोष्टी देत आहे. या सुविधा प्रकल्पांतर्गत १० प्युरिफायर, २० टीव्ही संच आणि १० एईडी मशिन्स (ऑटोमेटेड एक्स्टर्नल डीफ्रायबिलेटर्स) देण्यात येणार आहेत. एखाद्या प्रवाशाला हृदयविकाराचा त्रास झाल्यास प्रथमोपचार करण्यास त्याचा उपयोग होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84345 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..