
विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणे गरजेचे : महाजन
पुणे, ता. २७ : ‘‘विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या सोशल मीडियाच्या भडिमारात चांगले-वाईट काय, याची जाणीव मुलांना शिक्षकच नेमकेपणाने करून देऊ शकतात. मुलांचा मार्गदर्शक बनून शिक्षक ही जबाबदारीही उत्तमरीतीने पेलू शकतील,’’ असा विश्वास कवयित्री व लेखिका आश्लेषा महाजन यांनी व्यक्त केला.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणप्रेमी पुरस्काराचे वितरण नुकतेच झाले. यावेळी संस्थेच्या मराठी माध्यमातील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका समिक्षा गायकवाड यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सदस्य भारत वेदपाठक, पुरस्कार समन्वयक प्रसाद भडसावळे उपस्थित होते.
महाजन म्हणाल्या, ‘‘शिक्षणाबरोबर मुलांमधील अंगभूत गुणांना प्रोत्साहन देण्याचे आव्हान आजच्या शिक्षकांसमोर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नेमक्या वापरातून आजच्या बुद्धिमान पिढीचा सर्वांगीण विकास करत चांगल्या वाईटाची निवड करण्याबाबतचे मार्गदर्शन मुलांमध्ये शिक्षकच करू शकतात.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना गुजर यांनी केले.
-------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84375 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..