मोबाईल मनोरा बसविण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल मनोरा बसविण्याच्या
बहाण्याने तरुणाची फसवणूक
मोबाईल मनोरा बसविण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

मोबाईल मनोरा बसविण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाची २७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुयोग रवींद्र आढाव (वय ३२, रा. धानोरी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आढाव यांच्या मोबाईल क्रमांकावर चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला. आपण नामवंत मोबाईल कंपनीतून बोलत आहोत, असल्याचे त्यांनी फिर्यादीस सांगितले. त्यानंतर तुमच्या घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविल्यास दरमहा १२ हजार रुपये भाडे व १५ लाख रुपये अनामत रक्कम देऊ असे आमिष दाखविले. त्यास फिर्यादींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्राची मागणी केली. मोबाईल मनोरा बसविण्यासाठी सुरुवातीला मोबाईल कंपनीकडे काही शुल्क जमा करावे लागेल, अशी बतावणी केली. फिर्यादी आढाव यांना तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी ऑनलाइन माध्यमांद्वारे त्यांच्या बॅंक खात्यात २७ हजार ४६० रुपये जमा केले. दरम्यान, पैसे भरूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांकही बंद झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84379 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..