‘पेरा सीईटी’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पेरा सीईटी’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ
‘पेरा सीईटी’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

‘पेरा सीईटी’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : प्रीमिनन्ट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशन (पेरा) या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या ‘पेरा सीईटी’साठी ऑनलाइन अर्ज करण्यास मंगळवारपर्यंत (ता.२८) मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सीईटी परीक्षा ३० जून, १ व २ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अभियांत्रिकी, जैवअभियांत्रिकी, मरिन अभियांत्रिकी, डिझाइन, फाइन आर्टस्‌, फूड टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, विधी आणि कृषी अभियांत्रिकी या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा निकाल ९ जुलै रोजी जाहीर होईल, अशी माहिती ‘पेरा’तर्फे देण्यात आली.

या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड आणि उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84383 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..