जुन्या आठवणींना ३४ वर्षांनंतर उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या आठवणींना ३४ वर्षांनंतर उजाळा
जुन्या आठवणींना ३४ वर्षांनंतर उजाळा

जुन्या आठवणींना ३४ वर्षांनंतर उजाळा

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः महाविद्यालयीन जीवनानंतर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल ३४ वर्षांनंतर जिवाभावाचे मित्र पुन्हा एकदा एकत्र आले अन् एकमेकांच्या सुखदुखांत सहभागी होत गप्पांचा फड उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील १९८८ वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.

कोरोनाच्या काळात सोशल मीडीयाच्या माध्यमातून एकमेकांचे संपर्क क्रमांक मिळवून वाणिज्य पदवीधर प्रथम बॅचमधील वर्ग मित्र-मैत्रिणींचा ग्रुप तयार करण्यात आला. तेव्हापासूनच सर्वानी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याचे ठरवले होते. दरम्यानच्या काळात
यशवंत पवार, पोपट जैद आणि दत्ता रत्नपारखी यांचे कोरानामुळे निधन झाले. त्यामुळे त्यांची भेट अर्धवटच राहिली आणि अत्यंत मोठे दुर्दैव म्हणजे वर्गशिक्षक प्रा. जे. डी. टाकळकर यांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्याचे ठरले होते, मात्र त्यांच्यावरही काळाने घाला घातला. या सर्वांना कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या सर्व वर्गमित्रांनी आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल कथन केली. गाणी, विनोदाच्या सादरीकरणामुळे उपस्थितांची करमणूक झाली.
आरोग्य आणि शैक्षणिक मदत देण्याच्या उपक्रमाअंतर्गत पंधरा हजारांची मदत देण्यात आली. नियमीत भेटण्याची हमी घेऊन एकमेकांचा सर्वांनी निरोप घेतला.

स्नेहमेळाव्याच्या यशस्वितेसाठी अमृत टाकळकर, कैलाश चौधरी, सुनील नायकवडी, अरुण साकोरे, राजेंद्र घुमटकर, मोहन पवार आणि अभिमन्यू सांडभोर यांनी परीश्रम घेतले.
- - - - - - - - - -
राजगुरनगर ः स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आलेले माजी विद्यार्थी.
(७४०९९)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84448 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..