पुण्यात हलक्या सरींची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain
पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

पुण्यात हलक्या सरींची शक्यता

पुणे - पुणे शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असून, सध्या ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

शहरात रविवारी (ता. २६) रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू झाली. ती सोमवारीही (ता. २७) कायम होती. सोमवारी शहरात ०.५ मिलिमीटर, तर लोहगाव येथे चार मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. अधूनमधून पडणारे ऊन, त्यात पावसाच्या हलक्या सरींची हजेरी असा दुहेरी अनुभव सध्या पुणेकर अनुभवत आहेत. येत्या गुरुवारपर्यंत पुणे व परिसरात हलक्या ते मध्यम सरी कायम राहण्याची शक्यता असून, घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच, जुलैच्या सुरुवातीला म्‍हणजेच शुक्रवारी (ता. १) पावसाची काहीशी उघडीप असेल, त्यामुळे पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

महाबळेश्वरमध्ये ४० मिलिमीटर पाऊस

राज्यात पावसासाठी हवामान पोषक होत असून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान कोकणात पावसाच्या सरी कायम आहेत, तर ही स्थिती पुढील चार दिवस अशीच कायम राहणार आहे. मंगळवारी (ता. २८) कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्‍वर येथे ४० मिलिमीटर पावसाची झाली. राज्यात सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84544 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..