कृषी औद्योगिक कचऱ्यातून जैवइंधन पुण्यात पर्यायी इंधनाची निर्मिती करणारे स्टार्टअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी औद्योगिक कचऱ्यातून जैवइंधन
पुण्यात पर्यायी इंधनाची निर्मिती करणारे स्टार्टअप
कृषी औद्योगिक कचऱ्यातून जैवइंधन पुण्यात पर्यायी इंधनाची निर्मिती करणारे स्टार्टअप

कृषी औद्योगिक कचऱ्यातून जैवइंधन पुण्यात पर्यायी इंधनाची निर्मिती करणारे स्टार्टअप

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारात योग्य मोल मिळेल की नाही याची शंका असल्याने सध्या कृषी उत्पादनांपासून विविध खाद्यपदार्थ, पेय आणि इतर अनेक वस्तू बनविण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्यवसायांबरोबर त्यातून निघणारा कृषी विषयक आणि औद्योगिक कचरादेखील वाढत आहे.

कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू तयार करणाऱ्या क्षेत्रातून देशात दररोज शेकडो टन कचरा निर्माण होत असतो. त्यामुळे देशात टाकाऊ वस्तूंपासून ऊर्जा मिळवण्याची चळवळ वाढत आहे. देश पर्यावरणपूरक ऊर्जा निर्माण करण्याचा आणि पर्यायी इंधनाचा वापर शोधत असून, त्यामुळे तेल आयात करण्याचे प्रमाणदेखील कमी होईल. याच क्षेत्रात एस. वीराराघवन यांनी सुरू केलेले हे स्टार्टअप महत्त्वाचे ठरत आहे.

त्यांनी २०१८ साली दिल्लीत ‘ग्रीनज्युल्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Greenjoules Pvt Ltd.) हे स्टार्टअप सुरू केले. ‘स्टार्ट-अप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत असलेले हे स्टार्टअप कृषी औद्योगिक कचऱ्यातून जैवइंधन तयार करीत आहे. डिझेलशी तुलना असलेले हे इंधन बॉयलर, जनरेटरसाठी वापरले जाते. या स्टार्टअपने चाकण येथे बायो-रिफायनरी प्लांट उभारला आहे. वीराराघवन शंकरन, श्रीधर. व्ही. एस., सेतुनाथ रामास्वामी आणि राधिका वीराराघवन हे या स्टार्टअपचे सह-संस्थापक आहेत. स्टार्टअपने तयार केलेल्या जैवइंधनाची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई येथे चाचणी करण्यात आली आहे.

आमची उत्पादन प्रक्रिया पेट्रोल आणि एलपीजीसारखी इंधने असलेली उप-उत्पादनेदेखील तयार करते. त्यांचा वापर अनुक्रमे पेट्रोल आणि एलपीजी सप्लाय चेनमध्ये मिश्रण करण्यासाठी केला जाऊ शकतो. बायोचार हे आणखी एक उप-उत्पादन आहे. हे खत म्हणूनही वापरले जाऊ शकते. ते अधिक मूल्यवान सिलिका आणि सक्रिय कार्बनमध्ये बदलले जाऊ शकते. दोन्ही विविध उद्योगांमध्ये वापरले जाऊ शकते, अशी माहिती स्टार्टअपकडून देण्यात आली.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये
- डिझेल आणि एलपीजीसारख्या सध्या वापरल्या जाणाऱ्या जीवाश्म इंधनांच्या मानकांची पूर्तता
- कृषी कचरा, कृषी औद्योगिक कचरा (अन्न किंवा खाद्यपदार्थ नाही) वापरते
- हरितगृह वायूची नगण्य निर्मिती
- उत्पादनातून कोणताही घातक कचरा निर्माण होत नाही
- सर्व उप-उत्पादने विविध ठिकाणी वापरले जाऊ शकतात

उज्ज्वल भविष्यासाठी कचऱ्याचे रि-मॉडेलिंग या संकल्पनेसह आमचे कामकाज सुरू आहे. ग्रीनज्युल्स पर्यायी कृषी कचऱ्यावर काम करत आहे. कच्च्या मालाच्या प्रादेशिक उपलब्धतेवर आधारित आमचे कामकाज संपूर्ण भारतात विस्तारण्याची योजना आहे. शून्य हानिकारक उत्सर्जनासह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, देशात इंधनाचे उत्पादन करून परकीय चलन वाचवण्यासाठी, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून स्थानिक पातळीवर उद्योजकतेला चालना देण्यासाठी आवश्‍यक त्या बाबी आम्ही करीत आहोत.
- श्रीधर व्ही. एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रीनज्युल्स

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84619 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top