लग्नमंडप सजावटीवर ‘होऊ द्या खर्च’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage Decoration
लग्नमंडपांमध्ये ट्रेंडी सजावटीचा बोलबाला

लग्नमंडप सजावटीवर ‘होऊ द्या खर्च’!

पुणे - ‘लग्नमंडपांमध्ये हल्ली सजावटीच्या नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या जातात. यासाठी साधारणपणे पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत खर्च केले जातात,’ असे मंडप उभारणी आणि सजावट व्यावसायिक राहुल नवले यांनी सांगितले.

थाटाच्या लग्नांमध्ये याहून अधिक खर्च केला जातो. कमीत कमी खर्चात समारंभ करणारेही दहा - वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मांडवासाठी मोजतात, अशी माहिती नवले यांनी दिली.

ते म्हणाले, ‘मंडपात प्रवेशद्वाराच्या आकर्षक सजावटीची मागणीही अलिकडच्या काही वर्षांत दिसते. आतल्या सजावटीची झलक बाहेरूनच जाणवावी, याशिवाय बाहेरून येणाऱ्यांच्याही ती नजरेत भरावी; असा उद्देश असतो. सजावटीबद्दल ज्येष्ठांच्या कल्पना काहीशा पारंपरिक तर तरुणांकडून मात्र नावीन्यपूर्ण थीमवर भर दिला जातो. अनेक ठिकाणी लग्नमंडप हा चित्रपट किंवा मालिकेच्या सेटप्रमाणे वाटतो. ‘पेंडॉल डेकोरेशन’ असा शब्दप्रयोग करणाऱ्या तरुणांकडून पेंडॉलमध्ये निरनिराळे पॉइंट्स सुचवले जातात. यात डेस्टिनेशन वेडिंग विधी मंडप, पॅसेज, स्टेज, फोटो बूथ, सेल्फी पॉइंट वगैरे प्रकार करायला सांगितले जातात.’

‘वाडा’ संकल्पनेचे आकर्षण

सध्या कृत्रिम फुलांची सजावट जास्त चालते. मंडपाच्या थीममध्ये वाडा या संकल्पनेचेही आकर्षण आहे. आजी, आजोबा त्यांच्या काळच्या लग्नसमारंभातील प्रकाशाच्या झगमगाटाचं स्मरणरंजन करतात; पण नवी पिढी एलईडी बल्बच्या माळांची मागणी करते. स्टेजची मांडणीही वैशिष्ट्यपूर्ण करण्यावर भर असतो. काही ठिकाणच्या भिंतींवर लक्षवेधी सजावट करून मागितली जाते. महत्त्वाचे प्रसंग छोट्या पडद्यावर सर्वांना दिसतील, अशी व्यवस्था करण्यात येते. केटरिंगची जागाही सुशोभित करून हवी असते.

मागणीनुरूप सजावट अगदी विचारपूर्वक करण्याची काळजी आमच्यासारखे व्यावसायिक घेत असतात. आम्ही केलेले काम छायाचित्रे व व्हिडिओच्या रूपाने समाजमाध्यमांवरून असंख्य लोक पाहतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते दीर्घकाळपर्यंत संग्रहित राहतं. स्थळ- काळाच्या या व्याप्तीमुळे संबंधित वर-वधू व त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच त्या आठवणी आमच्यासाठीही महत्त्वाच्या ठरतात.

- राहुल नवले, व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84684 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top