एकनाथ शिंदेंविरोधात पुण्यात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ शिंदेंविरोधात पुण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंविरोधात पुण्यात तक्रार

एकनाथ शिंदेंविरोधात पुण्यात तक्रार

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : विधानसभा निवडणुकीकरिता वेळोवेळी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील तफावतींबद्दल शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मंगळवारी (ता. २८) शिवाजीनगर न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अतिरिक्त न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अभिजित खेडकर व डॉ. अभिषेक हरिदास यांनी ॲड. समीर शेख यांच्यातर्फे ही तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक सुनावणीनंतर ही तक्रार ठाणे येथील न्यायालयात वर्ग करण्यात येईल. शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. शिंदे यांनी २०१९ सालच्या प्रतिज्ञापत्रात शेयर्समधील गुंतवणुकीमधील युनिटचा तपशील लपवला आहे. या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी आर्माडा जीप ३० जानेवारी २००६ रोजी ९६ हजार ७२० रुपयांत खरेदी केल्याचे नमूद केले असून २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात ही जीप आठ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१९ प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी स्कॉर्पियो जीप एक लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर, २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात तीच जीप ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बोलेरो जीप एक लाख ८९ हजार ७५० रुपयांत खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर २०१४ सालच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हीच जीप सहा लाख ९६ हजार ३७० रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. टेंपो, इनोव्हा या वाहनांच्या खरेदीच्या किमतीबाबत तसेच शेतजमीन, व्यापारी गाळ्यांच्या माहितीबाबतही विसंगती असल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

उत्पन्नाबाबतही घोळ
२००९, २०१४ मधील प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले आहे. तर २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नीने चिखलगाव (जि. ठाणे) येथे जमीन खरेदी केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी २०१४ व २०१९ मधील प्रतिज्ञापत्रात व्यवसाय किंवा नोकरीच्या तपशिलात/उत्पन्नाच्या स्रोतांच्या तपशिलात शेतकरी असल्याचे नमूद केलेले नाही, असे तक्रारीत नमूद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84902 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top