जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतींची ४ आॅगस्टला निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतींची ४ आॅगस्टला निवडणूक
जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतींची ४ आॅगस्टला निवडणूक

जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतींची ४ आॅगस्टला निवडणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. यानुसार या ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या ५ आॅगस्टला होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जानेवारी २०२१ ते मे २०२२ आणि जून ते सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिसूचना येत्या ५ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ जुलैला तहसीलदार आपापल्या तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. यानुसार १२ ते १९ जुलै या कालावधीत (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. प्राप्त उमेदवारी अर्जांची २० जुलैला छाननी केली जाणार आहे. २२ जुलै ही उमेदवारी अर्ज माघारीची शेवटची तारीख असणार आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये शिरूर तालुक्यातील सर्वाधिक सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय हवेली तालुक्यातील पाच, इंदापूर तालुक्यातील चार आणि बारामती व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायती आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84939 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top