संस्कृत स्पर्धा परीक्षेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृत स्पर्धा
परीक्षेचे आयोजन
संस्कृत स्पर्धा परीक्षेचे आयोजन

संस्कृत स्पर्धा परीक्षेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : कोणत्याही माध्यमातील सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा संस्थेच्या वतीने ‘संस्कृत भाषा’ स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. यासाठी गीरर्वाणरसित भाग १ ते ३, संस्कृत भाषा दर्पण भाग १ व २ आणि प्रश्‍नसंग्रह या सहा पुस्तकांवर परीक्षा होणार आहे. यासाठी अर्जासह परिक्षा शुल्क १०० रुपये भरावे लागणार आहे. या परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांचे दोन लेखी पेपर व ५० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी किमान चाळीस गुणांची आवश्‍यकता राहणार आहे. ही परीक्षा सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असली, तरी इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांना तसेच संस्कृतप्रेमी पौढांसाठी खुली राहणार आहे, अशी माहिती संस्थेचे पुणे शाखेच्या अध्यक्षा मधुरा गोखले यांनी दिली. स्पर्धा परीक्षेत प्रत्येक गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना एक हजार, साडेसातशे आणि पाचशे रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी स्नेहा भोंग ९४२२०६२५३८ आणि अनुजा साने ९८८११४८३३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85010 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..