ई-बसना पुणे स्टेशन आगारात चार्जिंगची सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

E-Bus
आधी ई-बस धावणार, नंतर बसडेपोचे उद्‍घाटन पुणे स्टेशन येथून शहरातील विविध ठिकाणी उद्यापासून धावणार ई-बस

ई-बसना पुणे स्टेशन आगारात चार्जिंगची सुविधा

पुणे - पीएमपीच्या पुणे स्टेशन बस डेपोतून १ जुलैपासून ई-बससेवा सुरू होत आहे. यासाठी पीएमपी मात्र फेम २ च्या बसचा वापर न करता दोन्ही महापालिकांच्या निधीतून घेण्यात आलेल्या बसचा वापर करणार आहे. पीएमपीकडे सध्या अशा ३५० बस असून यापैकी २५ बस पुणे स्टेशन डेपोला देण्यात आल्या आहेत. या बस आता शहरातील विविध मार्गांवर धावणार आहेत.

पुणे स्टेशनचा बस डेपोत एका महिन्यापूर्वीच चार्जिंगची सोय करण्यात आली. केंद्र सरकारच्या फेम २ अंतर्गत पीएमपीला नव्या ई-बस देण्यात आल्या आहेत. याचे उद्‍घाटन केंद्रीय सचिवांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. मात्र अद्याप त्यांची वेळ मिळालेली नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने जेव्हा सचिवांना वेळ मिळेल तेव्हाच फेम-२ च्या बसचे उद्‍घाटन करण्याचे नियोजन केले आहे. मात्र तोपर्यंत नुकत्याच ताफ्यात दाखल झालेल्या ३५० बसपैकी २५ बस वापरण्याचे ठरविले आहे. १ जुलैपासून या बस धावतील.

या मार्गांवर धावणार बस...

नव्या ई-बस आळंदी, खराडी, हिंजवडी आणि कोंढवा या ठिकाणांसाठी धावणार आहेत. जेव्हा बस डेपोचे उद्‍घाटन होईल तेव्हा बसच्या संख्येत वाढ होईल. त्या मार्गांची संख्यादेखील वाढणार आहे. पुणे स्टेशन हा ई-बसचा पाचवा डेपो आहे. सध्या भेकराईनगर, निगडी, वाघोली आणि बाणेर या चार ठिकाणी इलेक्ट्रिक डेपो आहेत. पुणे स्टेशन येथून १ जुलैपासून पीएमपी ई-बससेवा सुरू करीत आहे.

येत्या १ जुलैपासून पुणे स्टेशन बस डेपोमधून ई-बससेवा सुरू करीत आहोत. याचे उद्‍घाटन केंद्रीय सचिवांच्या हस्ते होईल. त्यांची अद्याप वेळ मिळाली नाही. त्यामुळे १ जुलैपासून पुणे स्टेशन डेपोतून विविध मार्गांवर ई-बस धावतील.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punepmpCharging Stations