
एलजीबीटी समूहासाठी कायदेविषयक शिबिर
पुणे, ता. २९ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समूहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता निर्माण व्हावी, सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वीकाराची भावना वाढीस लागावी, यासाठी विशेष कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्हा न्यायालयात करण्यात आले. या वेळी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल दीपक कश्यप, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन कुलकर्णी आणि ॲड. यशपाल पुरोहित आदी उपस्थित होते. न्यायाधीश देशमुख यांनी एलजीबीटी समुहाच्या समस्येवर मार्गदर्शन केले. तसेच त्यांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले. या वेळी सचिव कश्यप म्हणाल्या, ‘‘प्राधिकरणातर्फे एलजीबीटी समुहाच्या हक्कासाठीची चळवळ संयुक्त राष्ट्राच्या स्टोनवाल उठावातून सुरू झाली. या समुहासाठी सार्वजनिक स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी तसेच त्यांना आधार कार्ड आणि ओळखपत्रासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85296 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..