पी. जी. वेंकटराम, योगेश वायंगणकरांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी. जी. वेंकटराम, योगेश वायंगणकरांचा सन्मान
पी. जी. वेंकटराम, योगेश वायंगणकरांचा सन्मान

पी. जी. वेंकटराम, योगेश वायंगणकरांचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : अॅल्युमनी असोसिएशन व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी)च्या वतीने दिला जाणाऱ्या एस. बी. जोशी व सी. व्ही. कांद पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले. या वेळी एल. अॅण्ड टी. इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पी. जी. वेंकटराम आणि एसटीयूपीचे सहप्रमुख व्यवस्थापक योगेश वायंगणकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी सीओईपीचे संचालक प्रा. एम. एस. सुतावणे, अॅल्युमनी असोसिएशन ऑफ सीओईपीचे अध्यक्ष भरत गिते, सचिव डॉ. एस. एस. परदेशी, पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रणदिवे आदी उपस्थित होते. या प्रसंगी केंद्रीय लोकसेवा व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सीओईपीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कांद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या वायंगणकर यांनी पुलांचे बांधकाम करताना त्यांना आलेल्या अडचणी व त्यांनी त्यावर केलेली मात या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. पुणे शहरात होत असलेल्या मेट्रोच्या डेक्कन व बालगंधर्व येथील पुलाच्या कामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. हा पूल तानपुऱ्याच्या आकाराचा असणार आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. वेंकटराम यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्याच्या पद्धतीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. शरणकुमार गौदार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85297 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top