करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला
करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी महिलेस जातिवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या करुणा शर्मा हिचा तात्पुरता जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अजयकुमार विष्णू देडे (वय ३२, रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद) व करुणा शर्मा (वय ४३, रा. सांताक्रुझ, मुंबई) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते ३० मे या कालावधीत घडला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर त्या प्रकाशात आल्या होत्या. या गुन्ह्यामध्ये शर्मा ही सध्या येरवडा कारागृहातमध्ये बंदिस्त आहे. तिने तात्पुरता जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. यातील फिर्यादीचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी शर्माचा तात्पुरता जामीन अर्ज हा कायद्यास धरून नसल्याचे न्यायालयास सांगितले. फिर्यादीच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि ॲड. आशुतोष शेळके यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85304 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top