कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंगवर ऑनलाइन प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृत्रिम बुद्धीमत्ता,
मशिन लर्निंगवर 
ऑनलाइन प्रशिक्षण
कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंगवर ऑनलाइन प्रशिक्षण

कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंगवर ऑनलाइन प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः संरक्षम संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ), ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी’च्या (डीआयएटी) वतीने कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंग या विषयावरील १२ आठवड्यांचा ऑनलाइन प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्कील इंडिया मिशन’ अंतर्गत सायबर सुरक्षा साध्य करण्यासाठी मानवी कौशल्य-संच तयार करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

काय असणार आहे?
या कोर्समध्ये संभाव्यता सिद्धांत, डेटा, अल्गोरिदम, ऑग्मेंटेड रियालिटी, संगणक भाषा प्रक्रिया सारख्या आधुनिक विषयांचा समावेश असेल. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व संसाधनांचा वापर केला जाणार आहे.

शास्त्रज्ञांची व्याख्याने
डीआयएटी, डीआरडीओ, उद्योग आणि विद्यापीठांमधील नामवंत प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांची व्याख्याने प्रशिक्षणादरम्यान आयोजित केले जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षा, प्रात्यक्षिके अशा विविध परीक्षांच्‍या आधारावर कोर्समधील प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन करत त्या आधारावर प्रमाणपत्रे प्रदान केले जाणार आहे. डीआयएटीने या पूर्वी सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगमध्ये ऑनलाइन प्रशिक्षणाच्या दोन कोर्स यशस्वीपणे पार पाडले. त्यामध्ये १५०० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देत प्रमाणपत्रे देण्यात आली.

हे लक्षात ठेवा...
- हा अभ्यासक्रम १२ आठवड्यांचा
- जुलै २०२२ पासून सुरू
- कोणत्याही शाखेतून पदवी किंवा नोकरी करणाऱ्यांना अर्ज करता येणार
- १० जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे
- इच्छुक उमेदवारांनी ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक
- संबंधित संपूर्ण माहिती, वेळापत्रक, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.diat.ac.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85363 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top