वारी व्यसनमुक्तीची वारी व्हावी ः भोई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारी व्यसनमुक्तीची
वारी व्हावी ः भोई
वारी व्यसनमुक्तीची वारी व्हावी ः भोई

वारी व्यसनमुक्तीची वारी व्हावी ः भोई

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘‘पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांची वारी ही विठ्ठल भेटी सोबतच व्यसनमुक्तीचीही वारी ठरावी, या दृष्टीने संत विचार प्रबोधिनीने स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे,’’ असे मत डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या संत विचार प्रबोधिनीच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लोणंद मुक्कामी वारकरी बांधवांसाठी गुटखा, तंबाखू, मिश्री आणि तोंडाचा कर्करोग या विषयावर डॉ. भोई यांचे व्याख्यान व स्लाइड शोचे आयोजन करण्यात आले होते. हे या उपक्रमाचे सलग पंधरावे वर्षे होते. व्याख्यानानंतर वारकरी बांधवांच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम पार पडला. अनेक वारकऱ्यांनी पांडुरंगाची शपथ घेऊन आम्ही आता गुटखा, तंबाखू, मिसरी यापासून लांब राहू असा निश्चय केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85379 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..