वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप पारंपरिक पद्धतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

change hostel admission process demand of student pune
वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप पारंपरिक पद्धतीने

वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप पारंपरिक पद्धतीने

पुणे : डिजिटल इंडियाद्वारे सरकार आपल्या सर्व सेवा डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे नागरिकांना वेळ वाचत असून याचा फायदाही होत आहे. असे असताना समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पारंपारिक पद्धतीने होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवावी, तसेच प्रवेश प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

शिक्षणासाठी राज्यभरातील विद्यार्थी शहरात येत असतात. महाविद्यालये अथवा शाळा सुरू झाल्या तरी वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसते, तसेच प्रवेश मिळेपर्यंत आणि थेट वसतिगृहात राहण्यास येण्यापर्यत निम्मे वर्ष संपून गेलेले असते. तोपर्यंत विद्यार्थ्यांना खोली भाड्याने घ्यावी लागते. बाहेर राहण्याचा खर्च सध्याच्या परिस्थितीत न परवडणारा आहे. यामुळे वसतिगृह प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया वेगाने आणि ऑनलाइन पद्धतीने राबवावी, असे मीना भिसे या पालकासह इतर विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे.

सर्वप्रथम अर्ज घेऊन त्यानंतर मागील वर्षात शिक्षण घेतलेल्या शाळेचा किंवा महाविद्यालयाचा सही शिक्का घ्यावा लागतो. त्यानंतर तो अर्ज सादर करावा लागतो. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया एका दिवसात होणारी नाही. याचा त्रास सहन करावा लागतो. ऑनलाइन प्रक्रिया केली, तर राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार होऊ शकणार आहे.
- कोमल शिंदे, पालक

वसतिगृहाचे प्रवेश प्रक्रिया ऑफलाइनसह ऑनलाइनदेखील असली पाहिजे. ऑनलाइनमुळे आहे त्या ठिकाणावरून अर्ज करता येऊ शकेल. पुण्यात शिकण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. पुण्यात येऊन अर्ज सादर करण्याचा त्रासापासून सुटका होईल. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल.
- नामदेव गंगासागरे, विद्यार्थी

वसतिगृहातील प्रवेशासाठी ११ वी, १२ वी आणि पदवीपर्यंत वसतिगृह प्रवेशाची यादी एकत्र न लावता वेगवेगळी लावावी. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना त्रासदायक असू नये.
- अविनाश कंधारे, विद्यार्थी


वसतिगृहात आचारसंहितेचे नियम वसतिगृहाच्या अर्जावर घेण्याचा नियम आहे. मात्र गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांकडून ते बॉण्ड पेपरवर लिहून घेतला आहे. हे अप्रत्यक्ष भीती दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येते.
- दशरथ थोटवे, पालक


गावातून केवळ अर्ज सादर करण्यासाठी शहरात यावे लागते. काही वेळेस काही कागदपत्रे चुकून सोबत जोडायची राहतात किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामुळे एका दिवसात काम होत नाही. बाहेर राहण्याची व्यवस्था करावी लागते. नाहीतर पुन्हा गावी जावे लागते. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी.
- लता सोनवणे, पालक


-समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे. सध्यातरी ऑनलाइनचे नियोजन नाही.
- संगीता डावखर, सहायक आयुक्त, समाकल्याण विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85454 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top