
निर्माण प्रतिष्ठानतर्फे चित्रपट स्पर्धा
पुणे, ता. १ : निर्माण प्रतिष्ठानच्या वतीने आणि भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या सहयोगाने ‘जरा याद उन्हे भी कर लो’ या अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी आणि महत्त्वाच्या घटना यांचे महत्त्व नागरिकांना कळावे, असा या स्पर्धेचा उद्देश असल्याची माहिती आयोजक नितीन शास्त्री यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे चरणजितसिंग संधू, भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुपमा पाटील, पद्मा एज्युकेशन सोसायटीच्या विश्र्वस्त जागृती धर्माधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी संधू म्हणाले, ‘‘भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय क्रांतिकारी आंदोलन, स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र दलाने दिलेला लढा हे या स्पर्धेचे विषय असणार आहेत. ही स्पर्धा ८ गटांमध्ये होणार असून, शालेय गट आणि खुला गट अशी विभागणी यामध्ये करण्यात आली आहे. ऑइल पेंटिंग, वॉटर कलर, अॅक्रेलिक आणि स्केच अशा स्वरूपात चित्रे यामध्ये पाठवता येतील. स्पर्धेनंतर देशातील काही प्रमुख शहरांमध्ये यातील चित्रांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे.’’
यासाठी इच्छुकांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत चित्रे पाठवता येतील. याबद्दल अधिक माहितीसाठी ८७६६०९७८८५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच http://theoffbeatdestinations.com/ या संकेतस्थळावरही नावनोंदणी करता येईल, असे शास्त्री यांनी या वेळी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85538 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..