स्टार्टअपसाठी मिळणार विद्यापीठात सीड फंड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्टअपसाठी मिळणार विद्यापीठात सीड फंड!
स्टार्टअपसाठी मिळणार विद्यापीठात सीड फंड!

स्टार्टअपसाठी मिळणार विद्यापीठात सीड फंड!

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांचे बीज भांडवल (सीड फंड) मिळाला आहे. याअंतर्गत निवडक स्टार्टअप्स्‌ना सीड फंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन ही स्टार्टअप विषयात काम करणारी सेक्शन ८ कंपनी असून, या माध्यमातून स्टार्टअप्स्‌ना मार्गदर्शन करणे, नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, निधी उपलब्ध करुन देणे, यावर काम करण्यात येते. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमांतर्गत ‘सीड फंड स्कीम’द्वारे फाउंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे. या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, गट किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकते. यासाठी पात्रतेच्या अटी ‘https://seedfund.startupindia.gov.in/’ या लिंकवर जाहीर केल्या आहेत.

संकल्पना, उत्पादन विकास, उत्पादन चाचण्या, बाजार प्रवेश आणि व्यापारीकरण या टप्प्यातील स्टार्टअप्स्‌ना यासाठी अर्ज करता येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

डॉ. पालकर म्हणाल्या, ‘‘विद्यापीठाकडे आलेल्या अर्जांची छाननी तज्ञांच्या समितीमार्फत केली जाईल. अर्जदारांना ४५ दिवसांत निकाल कळविला जाईल. निधीच्या २० टक्के रक्कम ही सुरवातीच्या टप्प्यावर असणाऱ्या स्टार्टअपसाठी देण्यात येईल. केंद्र सरकारच्या प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटरनल ट्रेड विभागांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्याच स्टार्टअप्स्‌ना या फंडासाठी अर्ज करता येणार आहे. दोन वर्षापेक्षा जुन्या असलेल्या कंपन्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85558 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..