विद्यार्थ्यांसाठी उद्या मोफत शैक्षणिक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी उद्या मोफत शैक्षणिक कार्यशाळा
विद्यार्थ्यांसाठी उद्या मोफत शैक्षणिक कार्यशाळा

विद्यार्थ्यांसाठी उद्या मोफत शैक्षणिक कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ व ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व विद्या शाखांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणासाठी यूएसएला जाण्याआधी करावी लागणारी तयारी’ याविषयी शनिवार (ता. २) दुपारी १२ वाजता झूम वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.
युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे प्रादेशिक अधिकारी व पश्चिम भारतातील अमेरिकन फुलब्राईट फेलोशिप कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले रायन परेरा झूम वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रायन परेरा यांना ‘यूएसए’मध्ये उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा ११ वर्षांचा अनुभव आहे.

याबाबत होणार मार्गदर्शन
१. अमेरिकन शिक्षण पद्धती, शैक्षणिक जीवन व संशोधन.
२. अमेरिकेतील शैक्षणिक जीवनासाठी आवश्यक असलेली नैतिकता आणि आचारसंहिता.
३. शैक्षणिक वर्गाच्या पलीकडे; सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण आणि यूएसए विद्यापीठांमधील विद्यार्थी जीवन.
४. इतर आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन.

असे व्हा सहभागी...
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ई-मेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85591 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top