दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांना अटक
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांना अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीस्वारांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या तसेच दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

मयूर मोतीराम राठोड (वय २१, रा. गणेशनगर, येरवडा), सुरेश बापू सकट (वय १९, रा. पुणे स्टेशन), सर्फराज मेहबूब मकानदार (वय २९, रा. बेळगाव शिवाजीनगर, कर्नाटक) व सुरेश बाबुदास वैष्णव (वय २६, रा. कामटे वस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा साथीदार दीपक ऊर्फ दिप्या रमेश कांबळे (रा. देहूरोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती इमारतीजवळील पडक्‍या घरामध्ये अंधारात काहीजण लपले आहेत. त्यांच्याजवळ धारदार शस्त्र असून, ते दुचाकीस्वारांना लुटण्याच्या तयारी आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून कटर, मिरची पावडर, लोखंडी सळई, कोयता अशी हत्यारे जप्त केली.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85593 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..