पुरुषांसाठी मानसिक आरोग्यावर उद्या मोफत वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुषांसाठी मानसिक आरोग्यावर उद्या मोफत वेबिनार
पुरुषांसाठी मानसिक आरोग्यावर उद्या मोफत वेबिनार

पुरुषांसाठी मानसिक आरोग्यावर उद्या मोफत वेबिनार

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः मानसिक आरोग्य, ताण-तणाव आणि जीवनशैलीतील बदल केवळ वृद्ध लोकांमध्येच दिसून येत नाही, तर सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या जगात तरुणवर्गही खूप ताणतणावातून जात आहे. पुरुषांच्या आरोग्यामध्ये मन, शरीर आणि औषधाची भूमिका समजून घेण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या we are in this together या मोहिमेंतंर्गत व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या सौजन्याने ‘पुरुषांच्या आरोग्यामध्ये माईंड बॉडी मेडिसिनची भूमिका’ या विषयावर आधारित सर्व वयोगटातील पुरुषांसाठी शनिवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजता मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निश्चोल रावल यांचा मार्गदर्शनपर मोफत झूम वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

डॉ. निश्चोल रावल यांनी बी. जे. मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, पुणे येथे मानसोपचार विषयात व्याख्याता म्हणून काम केले असून, मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपट, संशोधन प्रकल्प, औषधांच्या चाचण्या आणि ऑडिट तयार करण्यातही त्यांचा सहभाग आहे आणि त्यासंदर्भात त्यांची अनेक प्रकाशने प्रकाशित झाली आहेत. डॉ. रावल यांची इंडियन सायकियाट्रिक सोसायटी टास्क फोर्स ऑन माईंड बॉडी मेडिसिनमध्ये २०२२ पर्यंत निमंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.

याबाबत होणार मार्गदर्शन
१. माईंड बॉडी मेडिसिन म्हणजे काय ?
२. मन,शरीर, औषध आणि वर्तन यांच्यातील परस्परसंबंध.
३. आरोग्यामध्ये माईंड बॉडी मेडिसिनची भूमिका.
४. भावनिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक वर्तणुकीशी संबंधित घटकांचा थेट आरोग्यावर होणारा परिणाम.

मोफत हेल्पलाइन २४ तास
‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या we are in this together या मोहिमेच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव व मानसिक स्वास्थ्याच्या
समस्यांचे समुपदेशन करण्यासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन दोन वर्षांपासून सुरु आहे. यावर राज्यभरातून लोक मुक्त संवाद साधत आहेत. तसेच, we are in this together च्या अंतर्गत सातत्याने मानसिक आरोग्याशी निगडित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
हेल्पलाइन नंबर : ०२०-७११७१६६९
अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या : www.waitt.in


असे व्हा सहभागी...
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेले क्यूआर कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ई-मेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85599 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..