राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 
अंमलबजावणीसाठी समिती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती

sakal_logo
By

पुणे, ता. १ : राज्यातील अध्यापक शिक्षणसंस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी राज्यातील सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अध्यापक शिक्षणतज्ज्ञांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे हे या समितीचे अध्यक्ष असतील.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने दिलेल्या शिफारशीला अनुसरून राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या कार्यवाहीस काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अध्यापक शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे राज्यस्तरावर बी. एड. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी तातडीने हाती घेण्याची कामे, किमान संसाधनांची आवश्यक असलेले कार्यक्रम, मध्यम मुदतीचे कार्यक्रम, तसेच दीर्घकालीन आणि निधीची आवश्यकता असलेले कार्यक्रम यांचे नियोजन करणे अपेक्षित आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने निश्चित रूपरेषा तयार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

डॉ. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. मोहन खताळ, डॉ. नलिनी पाटील, डॉ. आसावरी भावे-गुडीपुडी, डॉ. वसुधा देव, डॉ. वैजंता पाटील हे सदस्य असणार असतील. तर डॉ. मेधा उपलाने या सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

असे असेल समितीचे कामकाज
शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमधील बी.एड. पदवी संबंधीचा चारवर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम, दोनवर्षीय आणि एका वर्षाचा बी.एड. अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांबाबत धोरणाशी सुसंगत कसा असेल व त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाची याचा आराखडा तयार करेल. या समितीला आपला अहवाल तीन महिन्यांत राज्य सरकारसमोर सादर करावा लागणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी अध्यादेशात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85840 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top