देशात घरांच्या मागणीत पुन्हा वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात घरांच्या मागणीत पुन्हा वाढ
देशात घरांच्या मागणीत पुन्हा वाढ

देशात घरांच्या मागणीत पुन्हा वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २ : कोरोना काळात थंडावलेली घरांची मागणी आता पुन्हा वाढू लागली आहे. देशातील बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आठही शहरांत गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा सदनिकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.
देशातील बांधकाम क्षेत्राची एप्रिल ते जून २०२२ या दुसऱ्या तिमाहीची स्थिती समजून घेण्यासाठी रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल अहवालानुसार, प्रॉपटायगर डॉट कॉमने विश्लेषण केले आहे. त्यात पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई महानगर प्रदेश आणि दिल्ली राजधानी परिसराचा सदनिका खरेदीचा आढावा घेण्यात आला आहे. बांधकामासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्याने घरांच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही त्याची खरेदी करणाऱ्यांच्या निर्णयावर फारसा परिणाम झालेला नाही. तसेच कोरोनानंतरच्या टप्प्यातील एकूण आर्थिक चित्र व उत्पन्नाच्या स्थैर्यात सुधारणा झाल्याचे अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार यंदाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत पाच टक्के वाढ झाली आहे. आघाडीच्या आठ शहरांत २०२२ मधील दुसऱ्या तिमाहीत ७४ हजार ३३० घरे विकली गेली आहेत. पहिल्या तिमाहीत हा आकडा ७० हजार ६२० होता. सर्वाधिक वाढ अहमदाबाद व हैदराबाद या शहरांत अनुक्रमे ३० टक्के व २१ टक्के आहे.

एप्रिल ते जून २०२२ या दुसऱ्या तिमाहीमधील सदनिकांची विक्री :
शहर-दुसरी तिमाही (२०२१)-पहिली तिमाही (२०२२)-दुसरी तिमाही (२०२२)- टक्केवारी
पुणे -२,५००-१६,३१०-१३,७२०--१६
अहमदाबाद - १,२८०-५,५५०-७,२४०-३०
बंगळूर -१,५९०-७,६७०-८,३५०-९
चेन्नई-७१०-३,३००-३,२२० - -२
दिल्ली एनसीआर-२,८३०-५,०१०-४,५२०--१०
हैदराबाद -२,४३०-६,५६०-७,९१०-२१
कोलकता -१,२५०-२,८६०-३,२२०-१२
मुंबई - २६,१५० -२३,३६० - ३,३८० - १२
एकूण -१५,९७०-७०,६२०--७४,३३०-५
स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एप्रिल-जून २०२२, प्रॉप टायगर रिसर्च

पुण्यात मागणी १६ टक्क्यांनी घटली
२०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत पुण्यात दोन हजार ५०० घरांची विक्री झाली होती. तर २०२२ च्या पहिल्या तिमाहीत १६ हजार ३१० विक्री झाली होती. मात्र, दुसऱ्या तिमाहीत विक्रीत १६ टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत १३ हजार ७२० घरांची विक्री झाली आहे.

आरबीआयने पहिल्या तिमाहीदरम्यान दोनदा रेपो दरात वाढ करून तो ४.९० टक्क्यांवर आणला आहे. तरीही अहवालात विश्लेषण केलेल्या कालखंडादरम्यान गृहकर्जे परवडण्याजोगे राहिली आहेत. स्वतःच्या मालकीची मालमत्ता असायला हवी हा घरांच्या मागणीत होत असलेल्या वाढीमागील सर्वांत मोठा घटक आहे. त्याला ग्राहकांचा एकूण आर्थिक परिस्थितीबाबतचा आत्मविश्वास व
उत्पन्नातील स्थैर्य यांची जोड मिळाली आहे.
- विकास वाधवान, हाउसिंग डॉट कॉम, प्रॉपटाइगर डॉट कॉम मकान डॉट कॉम, ग्रुप सीएफओ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85892 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..