पीएमपी : रस्ते, चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर सेवा होणार पुर्ववत सिंहगडावरील ई-बसला ‘ब्रेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपी : रस्ते, चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर सेवा होणार पुर्ववत 
सिंहगडावरील ई-बसला ‘ब्रेक’
पीएमपी : रस्ते, चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर सेवा होणार पुर्ववत सिंहगडावरील ई-बसला ‘ब्रेक’

पीएमपी : रस्ते, चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर सेवा होणार पुर्ववत सिंहगडावरील ई-बसला ‘ब्रेक’

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : नियोजनाअभावी अखेर सिंहगडावरील पीएमपीची ई-बससेवा अखेर स्थगित करावी लागली आहे. चार्जिंग अभावी बस बंद पडणे, घाटात अपघात होणे आदींसह विविध कारणांचा हवाला देत पीएमपीने मंगळवारपासून (ता. १७) ही सेवा बंद केली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असताना देखील ही सेवा स्थगित करण्याची नामुष्की पीएमपीवर ओढवली आहे.

सिंहगडावर येणाऱ्या दुर्गप्रेमी व पर्यटकांची सोय होण्यासाठी पीएमपी प्रशासनाने वन विभागाच्या मदतीने ई-बससेवा सुरु केली होती. गेल्या १ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सेवेचे उद्धाटन झाले होते. त्यानंतर २ मेपासून प्रवासी वाहतूक सुरु झाली. सुरुवातीला घाटात अरुंद रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला. ९ मीटर लांबीची बस वळणावर अडचणीची ठरली. तसेच चार्जिंगचा प्रश्नही उद्भवण्यास सुरुवात झाली. चार्जिंग स्टेशन गडावर होते. यामुळे चार्जिंग कमी झालेल्या बसला चार्जिंगसाठी पुन्हा गडावर यावे लागत होते. परिणामी बस वाटेत बंद पडत होत्या. त्यानंतर कठड्याला धडकून बसचा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच रविवारी (ता. १५) रात्री दहा वाजेपर्यंत प्रवासी अडकून पडले. त्यानंतर सर्व स्तरांतून पीएमपीच्या नियोजनाविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यामुळे अखेर सोमवारी पीएमपी प्रशासनाने ही सेवा स्थगित करीत असल्याचा निर्णय जाहीर केला.

पंधरा दिवसांत चाळीस हजार प्रवासी
गेल्या २ ते १६ मे दरम्यान पीएमपीच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजार प्रवाशांनी सिंहगडाला भेट दिली. यातून पीएमपीला सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनिवार व रविवारी प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. रविवारी (ता. १५) गडावर आंदोलन झाले. तरी देखील सुमारे ८ हजार प्रवाशांनी दिवसभरात सिंहगडाला भेट दिली. यावरून प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट होते.

पीएमपी आता करणार काय?
-सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व पीएमपी प्रशासन मंगळवारी (ता. १७) पुन्हा एकदा सिंहगडावरील घाट रस्त्यासह अन्य भागांची एकत्रित पाहणी करतील.
-बससेवा बंद असल्याच्या कालावधीत अरुंद रस्ते मोठे करणे, पायथ्याशी दोन चार्जिंग स्टेशन उभारणे, गडावर व पायथ्याशी प्रवाशांना बसथांबे उभारणे आदी कामे केली जाणार आहेत.

नऊ मीटरच्या बसचे नियोजन
अरुंद रस्तामुळे सात मीटर लांबीच्या बसचा वापर करण्यावर विचार झाला. मात्र, पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ई-बस या १२ व नऊ मीटर लांबीच्या आहेत. सात मीटरच्या बस या सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. त्यामुळे सिंहगडावर नऊ मीटरच्या ई-बसचा वापर करण्यात येणार आहे. सात मीटरच्या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात आल्यानंतर त्याचा वापर या मार्गावर केला जाईल.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिंहगडावरील बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात विविध कामे केली जातील. ती पूर्ण होताच पुन्हा प्रवाशांना ही सेवा पुरविली जाईल.
-डॉ लक्ष्मीनारायण मिश्रा,अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे

पीएमपी बससेवा मंगळवारपासून स्थगित केली आहे. त्यामुळे पर्यटकांना त्याचे वाहने गडावर घेऊन जाण्यास परवानगी दिली जाईल. तसेच तिथे व्यवसाय करणाऱ्या वाहनांना देखील परवानगी देण्यात येईल.
डॉ राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n06707 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top