नव्या भांडवलशाहीमध्येही शोषणाची बीजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या भांडवलशाहीमध्येही शोषणाची बीजे
नव्या भांडवलशाहीमध्येही शोषणाची बीजे

नव्या भांडवलशाहीमध्येही शोषणाची बीजे

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः देशातील जुन्या भांडवलशाहीत शोषणाची बीजे रुजलेली होती. ती आता नव्या भांडवलशाहीमध्ये दिसून येतात. राजकारण बदलत नाही, पण समाज बदलत आहे. ही या देशातील सर्वांत मोठी शोकांतिका आहे, अशी खंत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
आनंद करंदीकर लिखित ‘वैचारिक घुसळण’, ‘रोजगार निर्मितीची दिशा’, ‘माझ्या धडपडीचा कार्यनामा’ आणि ‘स्टोरीज ऑफ मार्केटिंग इन इंडिया’ या पुस्तकांच्या स्वागत समारंभात डॉ. आंबेडकर बोलत होते. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, परितक्त्या संघटनेच्या डॉ. निशा शिवूरकर, आयएमडीआरचे माजी संचालक सुशील कांदळगावकर, रोहनच्या संपादिका अनुजा जगताप, ज्येष्ठ विचारवंत अनंत भावे, सामाजिक कार्यकर्त्या साधना दधीच, गीताली वि. म., डॉ. अनंत फडके आदी उपस्थित होते.
करंदीकर म्हणाले की, ‘‘गेल्या चाळीस वर्षांत केलेल्या कष्टाचे फलित म्हणजे ही पुस्तके आहेत. एकूण समाज बदलाचा घेतलेला शोध या पुस्तकांमध्ये आहे. ही पुस्तके एकाच वेळी आली असली, तरी ती एका वेळी लिहिलेली नाहीत. त्यामागे कष्ट आहेत.’’
शिरसाट म्हणाले की, ‘‘समाजात सर्वच स्तरात वैचारिक घुसळण आवश्यक आहे. आणि त्यातून समतावादी वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवात आणि मशागत होईल.’’
कांदळगावकर म्हणाले की, ‘‘मार्केटिंगच्या करंदीकरांनी लिहिलेल्या गोष्टी त्यांच्या विस्तृत अनुभवावर आधारित आहेत. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शक आहेत.’’
शिवूरकर म्हणाल्या की, ‘‘बुद्धाने दहा परिमिता सांगितल्या आहेत. त्यातील काही आपल्याकडे असतात, काही कमवाव्या लागतात. आयुष्याच्या प्रवासात काही हात सोडतात, काही नव्याने येत असतात.’’ या पुस्तकात संशोधक वृत्ती आहे. लेखक कोणत्याही चौकटीत अडकला नाही.’’ सूत्रसंचालन विचारवेधचे अनिकेत साळवे यांनी केले.

रोजगार आणि महागाई हे सर्वांत मोठे प्रश्न लोकांसमोर आहेत. मात्र सध्या राज्यकर्ते या प्रश्नांपासून लांब असून भावनिक राजकारण करत आहेत. बाबरी कोणी पाडली, यावरून श्रेय वादाची लढाई सुरू आहे. त्याची खरी शरम वाटली पाहिजे.
- किरण मोघे, जनवादी महिला संघटना

PNE22S64714

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n11472 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top