आंबिल ओढ्याचे काम अपूर्णच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबिल ओढ्याचे काम अपूर्णच
आंबिल ओढ्याचे काम अपूर्णच

आंबिल ओढ्याचे काम अपूर्णच

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : पुराच्या जीवघेण्या संकटानंतर तीन वर्षे उलटली, तरीही महापालिकेकडून आंबिल ओढ्यासंदर्भात अनेक कामे पूर्ण झाली नाही. दहा पैकी केवळ पाच कलर्व्हटचे काम पूर्ण झाले आहे. नाल्यातील गाळ काढण्याचे काम अद्याप सुरु आहे, काही ठिकाणी सिमाभिंतींचे काम पूर्ण झालेली नाही, ही वस्तुस्थिती मंगळवारी माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी मंगळवारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली व उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी आंबिल ओढ्याची पाहणी केली. या वेळी कदम यांनी अपूर्ण आणि न झालेल्या कामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला पुर आला होता. या पुरात सात जणांचा बळी गेला. यानंतर महापालिकेने नाला रुंदीकरण, कल्वर्ट बांधणे, सीमाभिंत बांधणे, खोलीकरण करणे,अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. मित्रमंडळ येथे जलवाहिनी हलविली न गेल्याने तेथील पुलाचे काम अर्धवट राहीले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी तातडीने संबंधितांना पुलाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n70390 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top