जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणात महिला डॉक्टरची उलटतपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणात महिला डॉक्टरची उलटतपासणी
जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणात महिला डॉक्टरची उलटतपासणी

जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणात महिला डॉक्टरची उलटतपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात बेकरीजवळ क्लिनिक असलेल्या एका महिला डॉक्टरची मंगळवारी (ता. ७) साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. ‘मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकल्यानंतर धावत खाली गेले आणि लोकांची सुटका करण्यासाठी मदत करू लागले. मात्र मी प्रत्यक्ष घटना घडताना पाहिले नाही,’ असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याच्याविरोधात विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. बेकरीत भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे सीसीटीव्हीवरून निष्पन्न झाले होते. त्यानंतर यासीन भटकळ, मिर्झा हिमायत बेग यांच्यासह सात जणांवर एटीएसने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सोमवारी (ता. ६) सर्व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून केले आहे. भटकळतर्फे बाजू मांडण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ॲड. एस. व्ही. रणपिसे आणि ॲड. यशपाल पुरोहित यांची नियुक्ती केली आहे.
या प्रकरणात भटकळ याच्या सहभागाबाबत बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत जर्मन बेकरीच्या मालक स्मिता खरोसे यांच्यानंतर एका महिला डॉक्टरांची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. जर्मन बेकरी परिसरात त्यांचे क्लिनिक होते. जोरदार धमाका झाल्याचा आवाज झाल्यानंतर मी खाली आले आणि लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. बेकरीत आग लागलेली पाहिली नाही, असे डॉक्टरने न्यायालयास सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n75481 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top