‘बिझनेस अकाउंटिंग’विषयी विनामूल्य सेमिनारचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बिझनेस अकाउंटिंग’विषयी विनामूल्य सेमिनारचे आयोजन
‘बिझनेस अकाउंटिंग’विषयी विनामूल्य सेमिनारचे आयोजन

‘बिझनेस अकाउंटिंग’विषयी विनामूल्य सेमिनारचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : ‘बिझनेस अकाउंटिंग’च्या अभ्यासक्रमाविषयी व यातील करिअर संधींविषयी माहिती देणारा ऑफलाइन सेमिनार रविवारी (ता. २४) सकाळी साडेदहा वाजता पुणे येथे होणार आहे.

‘एपीजी लर्निंग’तर्फे ‘बिझनेस अकाउंटिंग’ हा एक अत्यंत यशस्वी अभ्यासक्रम गेली काही वर्षे चालविला जातो. उद्योग व सेवांसाठी लागणारी कौशल्ये शिकतानाच विकसित व्हावी, हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन तज्ज्ञांनी तयार केलेला हा अभ्यासक्रम आहे. प्रख्यात कन्सल्टिंग आणि ऑडिट संस्थांचे तज्ज्ञ संचालक हे यामध्ये मार्गदर्शन करतात. सध्या अकाउंटिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वाढती मागणी योग्य कौशल्यांसह पूर्ण करण्याचे काम या कोर्सद्वारे होणार आहे.

आजचे पदवीधर युवक प्लेसमेंटद्वारे प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये एक सन्मानजनक नोकरी, आकर्षक पगार आणि स्वतःची उच्च सामाजिक-आर्थिक स्थिती बनवण्यास इच्छुक आहेत. उद्योग, सेवा क्षेत्रात गरजेची असणारी कौशल्ये प्रदान करणारा, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि प्लेसमेंटसाठी आवश्यक असे संपर्क असल्याने विद्यार्थ्यांच्या अपेक्षापूर्तीचे काम या कोर्सद्वारे केले जाते.

बीकॉम, बीबीए, बीए, बीएस्सी अशा विविध प्रवाहांतील विद्यार्थ्यांसाठी हा सेमिनार उपयुक्त आहे.
स्थळ : एपीजी लर्निंग, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०२.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85720 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top