केंद्राच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp and congress
केंद्राच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

केंद्राच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पुणे - केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलविल्याने काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून भाजपच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. यावेळी भाजप विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘लोकशाहीचा गळा गोठला जात आहे. ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. बंद झालेल्या केसेस पुन्हा उकरून काढल्या जात आहेत. जर हिंमत असले तर न्यायालयात खटला दाखल करा. पण तसे न करता हुकूमशाही पद्धतीने चौकशा लावल्या जात आहेत, चार्जशीट दाखल न करता तुरुंगात डांबले जात आहे. निवडणुका समोर ठेवून जुन्या केसेस काढत आहेत, कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. राज्यात ईडी व पैशाच्या मदतीने कायदा मोडून सत्तांतर केले आहे. १ ऑगस्टला या शिंदे सरकारबाबत योग्य तो निर्णय होईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85750 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..