रोटरी पुणे गांधीभवनतर्फे अर्थसखी उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी पुणे गांधीभवनतर्फे अर्थसखी उपक्रम
रोटरी पुणे गांधीभवनतर्फे अर्थसखी उपक्रम

रोटरी पुणे गांधीभवनतर्फे अर्थसखी उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २१ः ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता रुजविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन या संस्थेने ज्ञान प्रबोधिनीच्या सहकार्याने अर्थसखी अभियान हाती घेतले आहे. महिलांना बॅंकेत खाते उघडून देणे आणि त्यायोगे विविध सरकारी योजनांची माहिती पोचविणे, असे अभियानाचे स्वरूप आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष पद्मजा जोशी यांनी दिली.
नुकताच रोटरी गांधी भवनचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जोशी म्हणाल्या, ज्ञान प्रबोधिनी हवेली, भोर आणि वेल्हे तालुक्यातील सुमारे २२५ महिला बचतगटांच्या संपर्कात आहे. या माध्यमातून सुमारे सहा हजार कुटुंब संपर्कात आहे. यातील काही महिलांना प्रशिक्षित करून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता पसरविण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
महिलांना अटल पेन्शन योजना, आयुष्यमान भारत योजना, विविध विमा योजना, सुकन्या योजना आदी समजावून सांगण्यात येणार आहे. तीन महिन्यात विविध कल्याणकारी योजनांमध्ये दोनशेहून अधिक सहभाग नोंदविण्यात आले असून, किमान वर्षभर हे अभियान चालू राहील, अशी माहिती जोशी यांनी दिली.
यावेळी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अनिल परमार, क्लब सेक्रेटरी अश्र्विनी शिलेदार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85755 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..