वंदेमातरम् संघटनेतर्फे सिमरनजीत सिंह मान यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदेमातरम् संघटनेतर्फे सिमरनजीत सिंह मान यांचा निषेध
वंदेमातरम् संघटनेतर्फे सिमरनजीत सिंह मान यांचा निषेध

वंदेमातरम् संघटनेतर्फे सिमरनजीत सिंह मान यांचा निषेध

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी शहीद भगतसिंग हे आतंकवादी होते, असे वक्तव्य केले. या वादग्रस्‍त वक्तव्यासाठी अशा खासदाराविरोधात वंदेमातरम् संघटनेच्‍या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. खासदार मान यांनी जाहीर माफी मागावी, तसेच माफी न मागितल्यास केंद्र आणि पंजाब सरकारने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी संघटनेद्वारा करण्यात आली. यावर कोणतीही पावले न उचलल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. हे निषेध आंदोलन वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष महेश बाटले, वरिष्ठ उपाध्यक्ष सूरज जाधव, कार्याध्यक्ष मोहित काकडे, उपाध्यक्ष आकाश गजमल आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85785 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..